जमीन दलालांच्या टोळीची फसवेगिरी

By Admin | Updated: May 21, 2014 04:42 IST2014-05-21T04:42:20+5:302014-05-21T04:42:20+5:30

दलालांच्या टोळीने ठाण्यातील व्यापारी पूनमचंद लीलाधर चढरीया यांना फसवून परस्पर लाखो रुपयांना विकल्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे.

Fraud gang gang of land brokers | जमीन दलालांच्या टोळीची फसवेगिरी

जमीन दलालांच्या टोळीची फसवेगिरी

आसनगाव : मुरबाड तालुक्यातील म्हाडस गावातील गरीब, दलित शेतकरी गौरु केशव उघडे यांच्या मालकीची शेतजमीन बोगस जमीन दलालांच्या टोळीने ठाण्यातील व्यापारी पूनमचंद लीलाधर चढरीया यांना फसवून परस्पर लाखो रुपयांना विकल्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे. मुरबाड (क) स्तर दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने बोगस दलालांविरुध्द मुरबाड पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गौरु उघडे यांची म्हाडस गावात १४३ या सर्व्हे नंबरमध्ये शेतजमीन आहे. ही जमीन विक्र ी करायची आहे अशी बतावणी करुन व्यापारी पूनमचंद चढरीया यांना जमीन दाखवली व त्यांना पसंत पडली. मूळ मालकाच्या नकळत संतोष गदलू साळवे (४९) रा. कवडास, ता.शहापूर याने मीच गौरु उघडे असल्याचा बनाव करु न पूनमचंद चढरीया यांना फशी पाडले. जमीन विक्रीच्या लाखो रुपयांची उलाढाल केली. ही बाब काही महिन्यांनी मूळ शेतकरी उघडे कुटुंबियांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. या गंभीर फसवणूकप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार संतोष साळवे, राम ऊर्फ रामचंद्र हिरामण शेळके (४०) रा.डोंगरनाव्हे, पप्पू संभाजी उघडे (३२) रा. म्हाडस , मगन चिंधू भोईर (४६) रा.शेलारी, गणेश गोपाल उघडे (३०) रा. म्हाडस, ता. मुरबाड या पाचही आरोपींविरुध्द मुरबाड पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मुरबाडच्या घटनेने जमीन विक्रीच्या व्यवहारात फसवणूक करणार्‍या बोगस दलालांच्या गोटात खळबळ उडाली असून अटकेच्या भीतीने पाचही आरोपी फरार झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांचा शोध सुरु आाहे. (वार्ताहर)

Web Title: Fraud gang gang of land brokers