झवेरी बाजारातील सराफाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:08 IST2021-02-09T04:08:13+5:302021-02-09T04:08:13+5:30

मुंबई : तपासणीसाठी दिलेले सोने परत न करता सराफाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार झवेरी बाजारात नुकताच समोर आला आहे. ...

Fraud of bullion in Zaveri Bazaar | झवेरी बाजारातील सराफाची फसवणूक

झवेरी बाजारातील सराफाची फसवणूक

मुंबई : तपासणीसाठी दिलेले सोने परत न करता सराफाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार झवेरी बाजारात नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत. यात २७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

........................................

जवानाची ऑनलाइन फसवणूक; गुन्हा दाखल

मुंबई : बॅँकेच्या ग्राहक सेवा केेंद्रातून बोलत असल्याचे जवानाची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी कफपरेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार हे कुलाबा परिसरात राहण्यास असून, त्यांना ई-वॉलेटवर चार हजार रुपयांचे रिवॉर्ड मिळाल्याची बतावणी करत ४० हजार रुपयांवर डल्ला मारला.

.....................................

पूर्ववैमनस्यातून हल्ला; तिघांना अटक

मुंबई : परेल परिसरात राहणारे अभिजित शिंदे (३६) हे दुचाकीवरून घरी जात असताना पूर्वीच्या भांडणातून सहा जणांनी पेव्हरब्लॉकने हल्ला चढविला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. दि. ८ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी काळाचौकी पोलीस अधिक तपास करत आहेत.

...................

Web Title: Fraud of bullion in Zaveri Bazaar