मुंबई - दसऱ्यासाठी गुजरातला जाताना तारापूर परिसरात दोन ट्रकच्यामध्ये चिरडून चौघांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास घडला. यात मृत्यमुखी पडणारे तिघे हे मालवणीच्या राठोडी परिसरतील आहेत. ज्यांची नावे प्रफुल्ल बारड (३६), त्यांची पत्नी उषा (३४), काका बांजीभाई बारड (६२) अशी आहेत. तर मयतांमध्ये वर्सोवाला राहणाऱ्या त्यांची आत्या कांचन बारड (४३) यांचाही समावेश आहे. या सर्वांवर मंगळवारी तमुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने मालवणी आणि वर्सोवा परिसरात शोककळा पसरली आहे.
गुजरातमध्ये झालेल्या भीषण अपघातात मुंबईतील चौघे ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 16:34 IST