Join us  

मालाडमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 12:17 PM

मालाडमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देमालाडमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.मालवणी येथील एमएचबी कॉलनीत सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला.

मुंबई - मालाडमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मालवणी येथील एमएचबी कॉलनीत रविवारी (1 सप्टेंबर) ही घटना घडली आहे. स्फोटामुळे घराची भिंत कोसळल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमधील मालवणी येथील एमएचबी कॉलनीत सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे घराची भिंत कोसळली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शितल काते (44), सिद्धेश गोटे, ममता पवार (22) आणि अश्विनी जाधव (26) हे चार जण जखमी झाले आहेत. 

 

टॅग्स :मुंबईस्फोटमृत्यू