तबलिग जमातच्या मुंबईतील चार कार्यालयांची ईडीकडून झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 04:33 IST2020-08-20T04:33:04+5:302020-08-20T04:33:11+5:30
अंधेरी, वांद्रे व पूर्व उपनगरातील दोन ठिकाणच्या कार्यालयावर कारवाई केली असून तेथील पत्रव्यवहार व कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

तबलिग जमातच्या मुंबईतील चार कार्यालयांची ईडीकडून झाडाझडती
मुंबई : दिल्लीतील निजामुदीन मर्कजशी संबंधित तबलिग जमातचे कार्य सुरू असलेल्या मुंबईतील चार कार्यालयाची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छाननी केली. मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगाने अंधेरी, वांद्रे व पूर्व उपनगरातील दोन ठिकाणच्या कार्यालयावर कारवाई केली असून तेथील पत्रव्यवहार व कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
मार्चमध्ये दिल्ली मर्कजमध्ये झालेल्या धार्मिक मेळाव्यासाठी देश, विदेशातून मुस्लीम भाविक जमले होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला, असा आरोप होता. मात्र वैद्यकीय तपासणीत मेळाव्यात सहभागींमध्ये कोरोनाचे प्रमण फारसे नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान या कालावधीत निझामुद्दीन मर्कजमध्ये होत असलेल्या इजतेमासाठी देशविदेशातून निधी येत असल्याच्या संशयातून तेथील प्रमुख मौलाना साद व त्यांच्या कार्यकारी मंडळावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्यानुसार, सोमवारी, मंगळवारी त्यांच्या अंधेरी, वांद्रे, पूर्व उपनगरातील कार्यालयातील दस्ताऐवज जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.