अकरावी ऑनलाइन प्रवेश; पावणे पाच लाख नावनोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 06:44 IST2025-05-28T06:43:59+5:302025-05-28T06:44:22+5:30
यंदा दीडशे कोर्सेससाठीची करिअर पाथ लिंक पोर्टलवर उपलब्ध

अकरावी ऑनलाइन प्रवेश; पावणे पाच लाख नावनोंदणी
मुंबई : राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत चार लाख ८६ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. त्यात २६ मे रोजी रात्री उशिरापर्यंत नोंद झालेल्या मुंबई विभागातील ३७,२४६ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. यंदा दीडशे कोर्सेससाठीची करिअर पाथ लिंक पोर्टलवर उपलब्ध झाल्याने अनेक विद्यार्थ्यांकडून त्याच लाभ घेतला जात आहे. तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी या सात माध्यमांतील उच्च माध्यमिक शिक्षण संस्थांचा या प्रवेश प्रक्रियेत समावेश आहे.
पार्ट वन, टू लॉक
राज्यात रात्री नऊ वाजेपर्यंत चार लाख ८६ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. राज्यातील एक लाख ७४ हजार ४७० विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा पार्ट वन लॉक केला, तर पार्ट टू लॉक केलेल्यांची संख्या ८१ हजार २२० इतकी आहे.
ऑनलाइन प्रक्रिया नाही
रात्र उच्च माध्यमिक विद्यालय
सैनिक उच्च माध्यमिक विद्यालय
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शाळा
एचएसव्हीसी व्यावसायिक अभ्यासक्रम
आदिवासी बांधणी
विभागाच्या आश्रमशाळा
मंडळाशी संलग्न नसलेल्या शाळा
राखीव जागांचा तपशील
अनुसूचित जाती १३%
अनुसूचित जमाती ७%
विमुक्त जाती अ ३%
भटक्या जमाती ब २.५%
भटक्या जमाती क ३.५%
भटक्या जमाती ड ०२%
विशेष मागास प्रवर्ग २%
इतर मागासवर्गीय १९%
सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग १०%
आर्थिक दुर्बल खुला प्रवर्ग १०%