महेश पवार
मुंबई: महापालिका निवडणुकीत भायखळा विधानसभेच्या सहा प्रभागांत आमदारांसह माजी आमदारांची कसोटी लागणार चार आहे. मिश्र लोकसंख्या, झोपडपट्टीबहुल भाग, पुनर्विकासाचे प्रश्न व स्थानिक उमेदवारांचा प्रभाव यामुळे एकाही पक्षाचे येथे वर्चस्व दिसत नाही. मराठी व मुस्लीम या दोन समाजांचे येथे प्राबल्य आहे. येथे ख्रिश्चन, उत्तर भारतीयही काही प्रमाणात असल्याने कधी, उद्धवसेना, शिंदेसेना, तर कधी काँग्रेस, एमआयएम या पक्षांना संधी येथील मतदारांनी दिली आहे. त्यामुळे सहा प्रभागांत यंदा चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत.
भायखळा विधानसभेचे अरुण गवळी (अभासे), मधू चव्हाण (काँग्रेस), मधू चव्हाण (भाजप), वारिस २०२४ पठाण (एमआयएम), यामिनी जाधव (शिंदेसेना) यांनी प्रतिनिधित्व केले आहे. च्या विधानसभेत उद्धवसेनेचे मनोज जामसुतकर यांनी यामिनी जाधव यांचा पराभव केला. मात्र, जाधव पुन्हा प्रभाग २०९ मधून रिंगणात उतरल्या आहेत. मनसेच्या हसीना माहिमकर यांच्याशी त्यांची लढत होत आहे. आ. जामसुतकर यांच्या पत्नी सोनम या २०१७ मध्ये काँग्रेसमधून निवडून आल्या होत्या.
नेत्यांच्या ताकदीची चाचणी
माजी आ. अरुण गवळी यांच्या मुली रिंगणात आहेत. प्रभाग २०७मधून योगिता गवळी व प्रभाग २१२ मधून गीता गवळी यांची अनुक्रमे मनसेच्या शलाका हरयाण व श्रावणी हळदणकर यांच्याशी लढत आहे.
काँग्रेसचे माजी आ. मधू चव्हाण यांचाही मोठा प्रभाव आहे. तर, सहापैकी एकाही प्रभागात उमेदवार न दिल्याने 'एमआयएम'चे येथील अस्तित्व संपुष्टात आले आहे. तर, भाजपने रोहिदास लोखंडे (प्रभाग २०७), संतोष राणे (२१०) असे दोन उमेदवार दिले आहेत.
Web Summary : Bhajkhala's municipal election sees a battle among ex-MLAs across six wards. Key issues include redevelopment and local candidates. Marathi and Muslim communities dominate. Shiv Sena, Congress, and MIM have previously won. A close contest is expected.
Web Summary : भायखला नगर निगम चुनाव में छह वार्डों में पूर्व विधायकों के बीच मुकाबला है। पुनर्विकास और स्थानीय उम्मीदवार प्रमुख मुद्दे हैं। मराठी और मुस्लिम समुदाय प्रमुख हैं। शिवसेना, कांग्रेस और एमआईएम पहले जीत चुके हैं। कड़ी प्रतिस्पर्धा की उम्मीद है।