विरार स्थानकाची 'बुलेट' पायाभरणी; ३५.३२ मीटर रुंद व ५० मीटर रुंद स्लॅब कास्टिंग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 06:52 IST2025-05-30T06:52:47+5:302025-05-30T06:52:54+5:30

१५५५ घनमीटर काँक्रीटचा होणार वापर

Foundation work for Virar station of Mumbai Ahmedabad Bullet Train project through National High Speed ​​Rail Corporation begins | विरार स्थानकाची 'बुलेट' पायाभरणी; ३५.३२ मीटर रुंद व ५० मीटर रुंद स्लॅब कास्टिंग सुरू

विरार स्थानकाची 'बुलेट' पायाभरणी; ३५.३२ मीटर रुंद व ५० मीटर रुंद स्लॅब कास्टिंग सुरू

मुंबई : नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असून महामुंबईत या प्रकल्पातील विरार या दुसऱ्या स्थानकाच्या पायाभरणीचे काम आता सुरू करण्यात आले आहे. या स्थानकासाठी पहिल्या स्लॅबचे कास्टिंग सुरू झाले असून तो ३५.३२ मीटर रुंद आणि ५० मीटर रुंद आहे. त्यासाठी १५५५ घन मीटर काँक्रीट वापरण्यात येणार आहे.

महाराष्ट्र-गुजरातदरम्यान ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम गुजरातसोबत महामुंबईमध्ये देखील वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाचे राज्यातील काम गुजरातपेक्षा उशिराने सुरू झाले असले तरी त्याने आता वेग पकडला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातील पहिल्या बीकेसी स्थानकाचे काम आधीच सुरू झाले आहे. महामुंबईतील ३ जिल्ह्यांमधून ही बुलेट ट्रेन धावणार असल्याने तो दोन राज्यांमधील महत्त्वाचा इकॉनॉमिक कॉरिडॉर ठरणार आहे.

बुलेट ट्रेनची उभारणी तीन पॅकेजमध्ये करण्यात येत असून तिसऱ्या पॅकेजमध्ये महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील १३५ किमी शिळफाटा आणि झारोळी गावादरम्यानच्या मार्गिका आणि ठाणे डेपोसह ठाणे, विरार, बोईसर स्थानक उभारणीचा समावेश आहे.

यातील विरार स्थानकाची पायाभरणी सुरू झाली असून एकूण ९ स्लॅबनंतर बुलेट ट्रॅक टाकण्यासाठी काम सुरू होणार आहे.

असे असेल विरार स्थानक 

विरार स्थानकाच्या तळमजल्यावर तिकीट आरक्षण केंद्र, सरकते जिने, लिफ्ट, प्रतीक्षागृह, प्रवासी सुविधा केंद्र, सुरक्षा तपासणी, प्रथमोपचार केंद्र, दुकाने असतील.

पहिल्या मजल्यावर ४ ट्रॅक असतील. त्यांच्या दोन्ही दिशांना प्लॅटफॉर्म असणार आहे.
 

Web Title: Foundation work for Virar station of Mumbai Ahmedabad Bullet Train project through National High Speed ​​Rail Corporation begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.