Join us  

सुदैवाने मोठी जीवित हानी टळली; दहिसर येथील कोविड सेंटरमध्ये आग, रुग्ण स्थलांतरित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 6:18 PM

Fire at Kovid Center in Dahisar : येथील आग शमविण्याचे काम सुरु असतानाच खबरदारीचा उपाय म्हणून आग लागलेल्या हँगर मधील रुग्ण ताबडतोब सी हँगर मध्ये स्थलांतरित करण्यात आले.

ठळक मुद्देमुंबई अग्निशमन दलाकडून प्राप्त माहितीनुसार, दुपारी बारा वाजता दहिसर जम्बो कोबिर सेंटर येथे हँगर एफ मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली.

मुंबई : भांडूप येथील ड्रिम्स मॉलमधील सनराईज या रुग्णालयास आग लागून ९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दहिसर येथील जम्बो कोविड सेंटर येथे हँगर एफ मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यंत्रणांनी वेळीच या आगीवर नियंत्रण मिळविल्याने हानी टळली. येथील आग शमविण्याचे काम सुरु असतानाच खबरदारीचा उपाय म्हणून आग लागलेल्या हँगर मधील रुग्ण ताबडतोब सी हँगर मध्ये स्थलांतरित करण्यात आले.

मुंबई अग्निशमन दलाकडून प्राप्त माहितीनुसार, दुपारी बारा वाजता दहिसर जम्बो कोबिर सेंटर येथे हँगर एफ मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. जी हँगर मध्ये  आग पसरली. एफ हँगर मध्ये ५० रुग्ण होते. जी हँगर मध्ये ४९ रुग्ण होते. एफ हँगर मध्ये आग लागल्याने तेथील वार्ड बॉयला प्रथम समजले. आगीची माहिती मिळताच दहिसर जम्बो कोविंड सेंटर येथे उपस्थित असलेले फायर फायटर्सच्या मदतीने मनपाचे सुरक्षारक्षक लक्ष्मण लांडगे व ईगल सेक्युरिटीचे रवींद्र मतो व इतर ईगल सुरक्षा रक्षक यांनी आग साधारणत: अर्ध्या तासात विझवली.

आग विझवत असताना आग लागलेल्या हँगर मधील रुग्ण ताबडतोब सी हँगर मध्ये स्थलांतरित करण्यात आले. शिवाय वीज पुरवठा सुद्धा खंडित करण्यात आला. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच कांदरपाडा फायर ब्रिगेडचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.

टॅग्स :आगकोरोना वायरस बातम्याअग्निशमन दल