संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, निवेदन देऊन केली ही मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 11:55 AM2022-11-18T11:55:44+5:302022-11-18T12:07:02+5:30

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घतेली.

Former MP Sambhaji Raje Chhatrapati met Chief Minister Eknath Shinde Deputy Chief Minister Devendra Fadnavis and made the demand by giving a statement | संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, निवेदन देऊन केली ही मागणी

संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, निवेदन देऊन केली ही मागणी

Next

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घतेली. यावेळी त्यांनी विविध मागण्याचे निवेदन दिले. शिवरायांवरील चित्रपटाच्या मुद्द्यावरुन ही भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. 

गेल्या काही दिवसापूर्वी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 'हर हर महादेव' या चित्रपटावर पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली होती. आता शिवरायांच्या चित्रपटाच्या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मागण्याचे निवेदन दिले. 

Recession in Britain:  ब्रिटनमध्ये मंदी जाहीर; ऋषी सुनक सरकारची घोषणा, आणीबाणीचा अर्थसंकल्प सादर

"राज्यातील विविध विषयांच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधी चित्रपट बनवत असताना त्यातील ऐतिहासिक तथ्ये, परंपरांचे योग्य सादरीकरण आदी महत्त्वपूर्ण बाबी तपासण्यासाठी सविस्तर निवेदन दिले." असं ट्विटमध्ये माजी खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे. 

"कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या विकासात्मक कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदने दिली. कोल्हापूरातील ऐतिहासिक स्थळांच्या जतन संवर्धन व विकासासाठी आवश्यक निधीच्या तरतूदीची मागणी केली,असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटावरुन संभाजीराजे छत्रपती चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना कडक शब्दात इशारा दिला. महाराजांवर आधारित चित्रपट काढण्यासाठी आमच्या परवानगीची गरज नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: Former MP Sambhaji Raje Chhatrapati met Chief Minister Eknath Shinde Deputy Chief Minister Devendra Fadnavis and made the demand by giving a statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.