Join us
Daily Top 2Weekly Top 5

माजी खासदार प्रिया दत्त यांना काँग्रेसच्या सचिवपदावरून हटवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 14:59 IST

काँग्रेस नेत्या आणि माजी खासदार प्रिया दत्त यांना पक्षाने सचिवपदावरून हटवले आहे.

मुंबई -  काँग्रेस नेत्या आणि माजी खासदार प्रिया दत्त यांना पक्षाने सचिवपदावरून हटवले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव अशोक गहलोत यांनी दत्त यांना पत्र पाठवून या निर्णयाची माहिती दिली आहे. दरम्यान, मुंबई प्रदेश काँग्रेसच्या रविवारी झालेल्या बैठकीत प्रिया दत्त यांना उत्तर-मध्य मुंबई मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रिया दत्त यांच्या उमेदवारीस विरोध केला होता. 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव अशोक गहलोत यांनी 26 सप्टेंबर रोजी प्रिया दत्त यांना या संदर्भात पत्र पाठवले होते. या पत्रात प्रिया दत्त यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले आहे. तसेच पक्षाला भविष्यातही त्यांच्या योगदानाची गरज भासेल, असे सांगण्यात आले आहे. 

 

टॅग्स :काँग्रेसप्रिया दत्तमुंबई