Join us

माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना कीर्तिकर यांचं निधन   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 09:24 IST

Meghna Kirtikar Passes Away:शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना कीर्तिकर यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं. त्या ८२ वर्षांच्या होत्या. 

शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना कीर्तिकर यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं. त्या ८२ वर्षांच्या होत्या. 

मेघना कीर्तिकर ह्या मागच्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारांदरम्यानच आज पहाटे ३.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. अंत्यदर्शनासाठी  त्यांचं पार्थिव आज संध्याकाळी ४ ते ६ या वेळेमध्ये स्नेहदीप, पहाडी रोड नं. २, आरे मार्ग, गोरेगाव (पूर्व) या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.   

टॅग्स :गजानन कीर्तीकरपरिवार