Join us

माजी आमदार पंडागळेंच्या मुलाची आत्महत्या, चित्रपट अभिनय क्षेत्रात होता कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 11:05 IST

समतानगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो आई-वडील आणि भावासोबत कांदिवली पूर्वेतील लोखंडवाला परिसरात राहत होता.

मुंबई : कांदिवली पूर्व परिसरात माजी आमदार राम पंडागळे यांच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जयेश राम पंडागळे (वय ३९) असे मृताचे नाव असून तो चित्रपट अभिनय क्षेत्रात कार्यरत होता.

समतानगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो आई-वडील आणि भावासोबत कांदिवली पूर्वेतील लोखंडवाला परिसरात राहत होता.सध्या जयेश गंभीर मानसिक तणावाखाली असल्याने तेच त्याच्या आत्महत्येमागील प्राथमिक कारण असल्याचे मानले जात आहे. घटनेच्या दिवशी त्याने कुटुंबीयांसोबत जेवण केले आणि नंतर त्याच्या बेडरूममध्ये निघून गेला. मात्र, त्यानंतर तो बाहेरच आला नाही. 

तेव्हा कुटुंबीयांनी बेडरूममध्ये जाऊन तपासणी केली असता त्यांना जयेशचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली आणि ते मृतदेह ताब्यात घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. 

जयेशचा मृतदेह भगवती शवविच्छेदन केंद्रात पाठविण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी एडीआर नोंदविला आहे. 

टॅग्स :मृत्यू