माजी न्यायमूर्ती सोडविणार लोढा बंधुंमधील वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 06:19 IST2025-02-01T06:19:16+5:302025-02-01T06:19:35+5:30
न्या. आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठाने लोढा बंधूंना हा वाद सामंजस्याने मिटविण्याचा सल्ला दिला.

माजी न्यायमूर्ती सोडविणार लोढा बंधुंमधील वाद
मुंबई : मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे पुत्रअभिषेक आणि अभिनंदन यांच्यात 'लोढा' ट्रेडमार्क वापरावरून असलेले वाद सोडविण्यासाठी उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायामूर्ती आर. व्ही. रवींद्रन यांची 'मध्यस्थ' म्हणून नियुक्ती केली. पाच आठवड्यांत कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
याआधीच्या सुनावणीत न्या. आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठाने लोढा बंधूंना हा वाद सामंजस्याने मिटविण्याचा सल्ला दिला. त्यासाठी 'मध्यस्थ' म्हणून ज्येष्ठ वकिलांची किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीची नेमणूक करण्याची तयारी दर्शविली. शुक्रवारच्या सुनावणीत दोन्ही पक्षांनी हा वाद सामंजस्याने सोडविण्याची तयारी दर्शविली. सकारात्मक प्रगती आहे, असे मध्यस्थांना वाटले तर मुदत वाढविली जाईल आणि जर मध्यस्थी अयशस्वी झाली तर अंतरिम दिलाशासाठी पुढील सुनावणी २१ मार्च रोजी ठेवली जाईल, असे न्यायालयाने म्हटले.