Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनिल देशमुखांच्या जामिनावरील निर्णय राखीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 07:25 IST

देशमुख यांच्या जामीन अर्जावरील निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला.

मुंबई :  आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोपी असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला.

ईडीच्यावतीने महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी न्या. एन. जे. जमादार यांच्या एकलपीठापुढे युक्तिवाद पूर्ण केला. देशमुख यांच्यावतीने ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी मंगळवारीच युक्तिवाद पूर्ण केला. बुधवारच्या सुनावणीत ईडीतर्फे सिंग यांनी देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्या. जामदार यांनी आपण या याचिकेवरील निकाल राखून ठेवत आहोत, असे म्हटले. 

टॅग्स :अनिल देशमुख