माजी क्रिकेटपटूच्या मुलाच्या वाहनाच्या धडकेने महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 05:22 IST2020-01-08T05:22:06+5:302020-01-08T05:22:13+5:30

बीसीसीआयमध्ये महाव्यवस्थापक (क्रिकेट आॅपरेशन) पदावर कार्यरत असलेले साबा करीम यांच्या मुलाच्या भरधाव वाहनाने पादचारी महिलेला उडवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली.

Former cricketer's son injured in vehicle collision | माजी क्रिकेटपटूच्या मुलाच्या वाहनाच्या धडकेने महिला जखमी

माजी क्रिकेटपटूच्या मुलाच्या वाहनाच्या धडकेने महिला जखमी

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टीरक्षक आणि बीसीसीआयमध्ये महाव्यवस्थापक (क्रिकेट आॅपरेशन) पदावर कार्यरत असलेले साबा करीम यांच्या मुलाच्या भरधाव वाहनाने पादचारी महिलेला उडवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी मुलगा फिदेल विरोधात गुन्हा दाखल करत गावदेवी पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळीतील प्रेमनगर परिसरात राहत असलेल्या सिद्धी मंडळ (२४) या मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास पेडर रोड येथील व्हिला टेरेसा स्कूलसमोरून रस्ता ओलांडत होत्या. त्याच दरम्यान गिरगाव चौपाटीच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या फिदेलच्या कारने त्यांना जोराची धडक दिली. अपघातामध्ये सिद्धी गंभीर जखमी झाल्या. स्थानिकांकडून अपघाताची माहिती मिळताच गावदेवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
पोलिसांनी याप्रकरणी सिद्धी यांचे पती अजय तक्रारीवरून फिदेल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सिद्धी यांची प्रकृती चिंताजनक असून फिदेल याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळते.

Web Title: Former cricketer's son injured in vehicle collision