Join us

‘धनुष्यबाण चोरला तरी राम माझ्यासोबत’; रामटेकच्या कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरेंचा संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 07:40 IST

रामानवमीनिमित्त मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी नागपूरमधील रामटेकहून शेकडो कार्यकर्ते पायी निघाले होते.

मुंबई : धनुष्यबाण जरी कागदावरचा नेला असला, तरी हे बाण माझ्या भात्यात आहेत. हे फक्त बाण नाहीत, तर हे ब्रह्मास्त्र आहेत. कार्यकर्त्यांचे हे  ब्रह्मास्त्र माझ्याबरोबर आहे. काही जणांनी धनुष्यबाण चोरला असला, तरी प्रभू राम माझ्यासोबत आहेत, अशा भावना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रामटेकहून आलेल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना व्यक्त केल्या.

रामानवमीनिमित्त मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी नागपूरमधील रामटेकहून शेकडो कार्यकर्ते पायी निघाले होते. गुरुवारी ते मातोश्रीवर पोहोचले. यावेळी ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले,  रामटेक ते इथपर्यंत पायी येणे ही हिंमत आहे. ही जिद्द तुम्ही जिथून आला असाल तिथपर्यंत पोहोचवा. तुम्ही सगळे सोबत आहात हीच माझी ताकद आहे. तुम्हाला मातोश्रीत यावे आणि माझ्यासोबत उभे राहावे असे वाटणे, हा मी रामाचा आशीर्वाद मानतो.

...तर लंकादहन शक्य 

लोकशाही वाचवणं हे केवळ माझ्या एकट्याचे काम नाही किंवा माझ्या एकट्यासाठी नाही. आपण सगळे एकत्र आलो, तर लंकादहन करू शकणार नाही का? असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना