Join us

मुंबईत पक्षाच्या वाढीसाठी देवेंद्र फडणवीसांची रणनीती; भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचे जाणून घेतले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 18:44 IST

राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था स्थिती व अराजकता माजविणाऱ्या शक्तींकडे राज्य सरकाकडून झालेले दुर्लक्ष याकडेही त्यांनी  लक्ष वेधले.

मुंबई: माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईतीलभाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांशी मनमोकळा संवाद साधला. मुंबईत पक्षाच्या वाढीसाठी काय करता येईल याविषयी या नेत्यांचे मत फडणवीस यांनी जाणून घेतले. 

मुंबई भाजपा उपाध्यक्ष अमरजित मिश्र यांच्या ' दीप कमल फाऊंडेशन ' या संस्थेच्या अटल चेतना या पुस्तिकेचे प्रकाशन  फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजकीय प्रवासाबाबत मनोगत व्यक्त करून त्यांनी दिलेल्या योगदानाचा आढावा त्यांनी आपल्या भाषणात घेतला. 

राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था स्थिती व अराजकता माजविणाऱ्या शक्तींकडे राज्य सरकाकडून झालेले दुर्लक्ष याकडेही त्यांनी  लक्ष वेधले. या कार्यक्रमाला माजी आमदार वीणा प्रेमकुमार शर्मा , माजी उपमहापौर अरुण देव, ईशान्य मुंबई माजी जिल्हाध्यक्ष दिलीप हजारे , मध्य दक्षिण मुंबईचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप गोडांबे, महिला आयोगाच्या माजी सदस्य नफिसा हुसेन आदी उपस्थित होते. अमरजित मिश्र यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपामुंबई