टीआरपी घोटाळ्यात बीएआरसीचे आजी-माजी कर्मचारी गुंतल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 02:11 IST2020-12-19T02:11:16+5:302020-12-19T02:11:32+5:30

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी बीएआरसीचे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) रोमील रामगडिया (४०) यांना मुंबईतून अटक केली.

Former BARC employees suspected of being involved in TRP scam | टीआरपी घोटाळ्यात बीएआरसीचे आजी-माजी कर्मचारी गुंतल्याचा संशय

टीआरपी घोटाळ्यात बीएआरसीचे आजी-माजी कर्मचारी गुंतल्याचा संशय

मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी बीएआरसीच्या सीओओला अटक होताच, यात बीएआरसीचेही आजी माजी कर्मचारी यात गुंतल्याचा संशय सीआययूला आहे. त्यानुसार, सीआययूचे पथक अधिक तपास करत आहे.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी बीएआरसीचे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) रोमील रामगडिया (४०) यांना मुंबईतून अटक केली. रोमील यांनी ‘बीएआरसी’मध्ये उपलब्ध गोपनीय माहिती ‘एआरजी आउटलायर’ कंपनीला पुरवून रिपब्लिक वृत्त वाहिन्यांचा टीआरपी वाढविण्यात सहकार्य केले. ‘एआरजी आउटलायर’ कंपनीचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासोबतचे व्हॉट्सअ‍ॅप संभाषण हाती लागले आहे. त्यानुसार, रोमील यांच्यावर कारवाई करण्यात आली.

रोमील यांच्यासह बीएआरसीच्या आणखी कुठल्या कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे का? याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Former BARC employees suspected of being involved in TRP scam