Raj Thackeray: "मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मी माझे २० वर्षांचे मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतो, यावरूनच माझ्या भूमिकेची तीव्रता तुम्हाला समजली पाहिजे. पण दुर्दैवाने सत्ताधारी फक्त दिल्लीचे आदेश पाळण्याचे काम करततात," अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
मैत्री एका बाजूला आणि महाराष्ट्र एका बाजूला!
राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या मैत्रीचा उल्लेख करत असतानाच त्यांच्या धोरणांवर सडकून टीका केली. फडणवीसांनी हिंदी सक्तीचा विषय आणल्याबद्दल राज यांनी संताप व्यक्त केला. "देवेंद्र फडणवीसांनी हिंदी सक्तीचा विषय कशासाठी आणला? मैत्री आपली जागेवर आहे, पण महाराष्ट्र हिताचा प्रश्न येतो तेव्हा तडजोड शक्य नाही. महाराष्ट्र एका बाजूला आणि मैत्री एका बाजूला," असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.
'शिंदे-फडणवीस फक्त सह्यांचे धनी'
राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणावर बोलताना राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणतेही स्वातंत्र्य नसल्याचा दावा केला. "देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या हातातच काही नाही. जे सांगितले जाईल त्या गोष्टींवर सही करायची. एकनाथ शिदेंचे तिकडे जाणे हा सत्तेचा भाग झाला," अशी बोचरी टीका राज यांनी केली.
मराठीसाठी जुळवून घेण्याची भूमिका
सत्ताधाऱ्यांसोबत जुळवून घेऊन मराठीसाठी काम करता आले असते का? या प्रश्नावर राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले.
"राजकीय मतभेद एका बाजूला पण मराठी, हिंदी सक्ती या गोष्टींवर तडजोड होणार नाही. महाराष्ट्रातील या गोष्टींवर तुम्ही काही बोललात तर मी मैत्री नाही पाहणार. मला राजकारणात खूप वर्षे झाली. ज्या संस्कारातून तुम्ही घडत असता त्या तुमच्यात राहतात. हा माझा आडमुठेपणा किंवा राजकीय मूर्खपणा नाही. सरेंडर व्हायला किती वेळ लागतो. आजूबाजूला आपण बघतचं आहोत. पण मैत्री एका बाजूला आणि महाराष्ट्र एका बाजूला. जर मी माझे २० वर्षांचे मतभेद सोडून फक्त मराठीसाठी एकत्र येऊ शकतो तर माझी त्याविषयीची तीव्रता तुमच्या लक्षात येईल, वाईट यासाठी वाटतं की आपली लोकं अजून भ्रमात आहेत. तुमच्या दरवाज्यावर टकटक होईल त्यावेळी मी काय म्हणत होतो हे कळेल," असं राज ठाकरे म्हणाले.
Web Summary : Raj Thackeray criticized Fadnavis and Shinde for prioritizing Delhi's orders over Maharashtra's interests. He emphasized his commitment to Marathi identity, even setting aside 20-year differences. He accused them of lacking independence and merely signing off on decisions.
Web Summary : राज ठाकरे ने फडणवीस और शिंदे पर महाराष्ट्र के हितों से ऊपर दिल्ली के आदेशों को प्राथमिकता देने के लिए निशाना साधा। उन्होंने मराठी पहचान के प्रति अपनी प्रतिबद्धता पर जोर दिया, यहां तक कि 20 साल के मतभेदों को भी दरकिनार कर दिया। उन्होंने उन पर स्वतंत्रता की कमी और केवल निर्णयों पर हस्ताक्षर करने का आरोप लगाया।