Join us

संघ-भाजपमध्ये पहिल्यांदाच समन्वयक, विश्वास पाठक यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 09:17 IST

RSS-BJP News: राज्य सरकार, भाजप, रा. स्व. संघ व संघ परिवारातील विविध संघटना यांच्यात समन्वय साधण्यासाठी पहिल्यांदाच प्रदेश समन्वयकपद निर्माण करण्यात आले असून, त्यावर विश्वास पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई : राज्य सरकार, भाजप, रा. स्व. संघ व संघ परिवारातील विविध संघटना यांच्यात समन्वय साधण्यासाठी पहिल्यांदाच प्रदेश समन्वयकपद निर्माण करण्यात आले असून, त्यावर विश्वास पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भाजप आणि संघाची दोन दिवसांपूर्वी नागपुरात बैठक झाली. तीत हे समन्वयकाचे पद निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पाठक यांना नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. पाठक हे प्रदेश भाजपचे प्रवक्ते आहेत तसेच ते एमएसईबीच्या सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालकदेखील आहेत. २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात सरकार आणि भाजप यांच्यात समन्वय राहावा म्हणून भाजपचे तत्कालीन पदाधिकारी श्रीकांत भारतीय यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयात ओएसडी म्हणून करण्यात आली होती.

टॅग्स :भाजपाराष्ट्रीय स्वयंसेवक संघ