तुमचे वीज बिल तुमच्यासाठीच; डाउनलोडसाठी लॉगिनची सक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 12:27 IST2025-08-15T12:27:31+5:302025-08-15T12:27:31+5:30
केंद्राच्या सायबर सुरक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बदल

तुमचे वीज बिल तुमच्यासाठीच; डाउनलोडसाठी लॉगिनची सक्ती
मुंबई : सायबर सुरक्षितता आणि वीज ग्राहक माहितीच्या गोपनीयतेसाठी महावितरणच्या लघुदाब वर्गवारीच्या वीज बिलाची पीडीएफ प्रत अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी ग्राहकांना नोंदणीकृत प्रवेश (लॉगिन) करणे अनिवार्य केले आहे. केंद्राच्या सायबर सुरक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बदल केला आहे, अशी माहिती महावितरणने दिली.
महावितरणच्या संकेतस्थळावरील 'वीजदेयक अवलोकन/भरणा' पेजवर लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ग्राहकांना चालू महिन्याच्या वीज बिलाची पीडीएफ प्रत ऑनलाइन डाउनलोड करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, याआधी केवळ १२ अंकी ग्राहक क्रमांक सबमीट करून वीज बिल डाऊनलोड करण्याची सोय होती.
लॉगिनसाठी नोंदणी करा
आतापर्यंत लॉगिनसाठी नोंदणी न केलेल्या ग्राहकांनी त्यांचा ग्राहक क्रमांक, मोबाइल क्रमांक तसेच ई-मेल (असल्यास) माहिती भरून नोंदणी करावी, लॉगिन आयडी व पासवर्ड निश्चित करावा. त्यासाठीदेखील लिंक त्याच ठिकाणी उपलब्ध आहे.
एकापेक्षा अधिक वीज जोडण्यांसाठी सेवा नोंदणीकृत प्रवेश (लॉगिन) केल्यानंतर स्वतःच्या एकापेक्षा अधिक वीज जोडण्यांसाठी विविध ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे. या सुविधेचा लाभघेण्यासाठी लॉगिन केल्यानंतर १२ अंकी ग्राहक क्रमांक लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही.
नव्या बदलात वीज बिल लॉगिनशिवाय ऑनलाइन भरण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. मात्र, पीडीएफ वीज बिल डाउनलोड करण्यासाठी नोंदणीकृत प्रवेश (लॉगिन) करणे अनिवार्य आहे. लॉगिनची लिंकही 'वीजदेयक अवलोकन/भरणा' पेजवर उपलब्ध आहे.
सर्व सेवांचा लाभ
वीज बिलावरील नाव, वीज भार बदलणे, तक्रार करणे किंवा तक्रारीची सद्य:स्थिती पाहणे, वीज बिलांचा भरणा, पत्ता बदलणे व इतर ऑनलाइन सेवांचा वीज ग्राहकांना लाभ घेता येईल.
नव्या बदलात वीज बिल लॉगिनशिवाय ऑनलाइन भरण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. मात्र, पीडीएफ वीज बिल डाउनलोड करण्यासाठी नोंदणीकृत प्रवेश (लॉगिन) करणे अनिवार्य आहे. लॉगिनची लिंकही 'वीजदेयक अवलोकन/भरणा' पेजवर उपलब्ध आहे.