मुंबईतील कॅटरिंंग व्यावसायिकांना एफडीएने दिले अन्नसुरक्षेचे धडे; ‘इट राइट इंडिया’ मिशन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 01:05 AM2020-01-13T01:05:12+5:302020-01-13T06:35:55+5:30

या मिशनद्वारे कॅटरिंग सेवा पुरविणाºया व्यावसायिकांची कार्यशाळा घेऊन, सुरक्षित, निर्भेळ व आरोग्यदायी अन्नपदार्थ कसे पुरविता येतील, याचे मार्गदर्शन केले जाते.

Food safety lessons provided by FDA to catering professionals in Mumbai | मुंबईतील कॅटरिंंग व्यावसायिकांना एफडीएने दिले अन्नसुरक्षेचे धडे; ‘इट राइट इंडिया’ मिशन

मुंबईतील कॅटरिंंग व्यावसायिकांना एफडीएने दिले अन्नसुरक्षेचे धडे; ‘इट राइट इंडिया’ मिशन

Next

मुंबई : मुंबई शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक दाखल होतात. विविध व्यवसाय, नोकरी, उद्योगधंदे इत्यादी कामांमुळे नागरिकांना बाहेरील अन्नपदार्थांवर अवलंबून राहावे लागते. समारंभ, कार्यक्रम आदींसाठी कॅटरिंग व्यावसायिक अन्नपदार्थांचा पुरवठा करतात. नागरिकांना सुरक्षित, निर्भेळ व आरोग्यदायी अन्नपदार्थ मिळत नाहीत. अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली आणि अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने ‘इट राइट इंडिया’ मिशन सुरू करण्यात आले आहे. या मिशनद्वारे कॅटरिंग सेवा पुरविणाºया व्यावसायिकांची कार्यशाळा घेऊन, सुरक्षित, निर्भेळ व आरोग्यदायी अन्नपदार्थ कसे पुरविता येतील, याचे मार्गदर्शन केले जाते.

अन्न व औषध प्रशासनातर्फे कॅटरिंग सर्व्हिस देणाºया व्यावसायिकांमध्ये स्वच्छता, सुरक्षित अन्न बनविणे, बनविलेले अन्न योग्य पद्धतीने हाताळून नागरिकांपर्यंत पोहोचविणे, याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी नुकतेच कार्यशाळेचे आयोजन करण्यात
आले होते. ही कार्यशाळा अन्न व औषध प्रशासनाच्या रांगणेकर सभागृहात पार पडली. यावेळी सुमारे १३१ अन्नसेवा पुरविणारे व्यावसायिक कार्यशाळेत सहभागी झाले होते. पी. बी. उमराणी सहायक आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई यांनी अन्नपदार्थ पुरविणाºया व्यावसायिकांना सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले.

कॅटरिंगची सेवा पुरविणाºया व्यावसायिकांना प्रशिक्षणादरम्यान अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत अन्न परवाना/नोंदणी का? आणि कायद्यातील इतर तरतुदींचीसुद्धा माहिती दिली गेली. स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात अन्नपदार्थ बनविताना कामगारांनी वैयक्तिक स्वच्छता ठेवली पाहिजे. ‘फॉस्टॅक’ या योजनेंतर्गत प्रशिक्षणांर्थींनी प्रशिक्षण घेतले पाहिजे. दररोज खाद्यपदार्थ तळून उरलेले तेल ‘रूको’ या योजनेंतर्गत जतन करून बायो डिझेल बनविण्यासाठी देणे. याशिवाय अन्नपदार्थ वाया जाऊ नये व त्याची नासाडी होऊ नये, याची काळजी घेण्याचे व आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन एफडीएकडून करण्यात आले. याप्रसंगी, अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तसेच आयुक्त (अन्न), बृहन्मुंबई विभागाचे श. रा. केकरे, सहआयुक्त (विधी) ग. सु. परळीकर, बॉम्बे कॅटरर असोसिएशनचे अध्यक्ष योगेशे चंदाराणा यांची उपस्थिती होती.

Web Title: Food safety lessons provided by FDA to catering professionals in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :FDAएफडीए