लग्नात अन्नातून विषबाधा; 20 जण रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 22:41 IST2018-11-05T22:41:13+5:302018-11-05T22:41:30+5:30

वांद्रे येथील एका लग्न सोहळ्यात जेवणातून 20 जणांना विषबाधा झाली. बाधाग्रस्तांना त्वरित सांताक्रूझ येथील व्ही.एन. देसाई रुग्णालयात दाखल केले.

Food poisoning at the wedding; 20 people admitted to the hospital | लग्नात अन्नातून विषबाधा; 20 जण रुग्णालयात दाखल

लग्नात अन्नातून विषबाधा; 20 जण रुग्णालयात दाखल

मुंबई - वांद्रे येथील एका लग्न सोहळ्यात जेवणातून 20 जणांना विषबाधा झाली. बाधाग्रस्तांना त्वरित सांताक्रूझ येथील व्ही.एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. यातील 9 जणांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले. तर 11 जण अद्यापही रुग्णालयात दाखल आहेत. यात तीन लहान मुले आणि 6 महिला आहेत. अन्नातून विषबाधा झाली असल्याचा आरोप बाधाग्रस्तांच्या नातेवाईकांनी यावेळी केली.

मात्र, याठिकाणी 800 जण जेवल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  वांद्रे येथे मुश्ताक शेख यांच्या लग्नाची मेजवानी देण्यात आली होती. यादरम्यान सर्व जणांचे जेवण झाल्यानंतर त्यातील काही जणांना त्रास होऊ लागला. यात लहान मुलांचा आणि महिलांचे प्रमाण अधिक होते. या मेजवानीत चिकनचे विविध पदार्थ ठेवण्यात आले होते. हे पदार्थ खाल्याने उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. यात एकूण 20 जणांना विषबाधा झाली. ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली याचे निदान करण्यात येईल, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

Web Title: Food poisoning at the wedding; 20 people admitted to the hospital