दुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 04:41 AM2019-01-24T04:41:32+5:302019-01-24T04:41:38+5:30

राज्यातील दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पूनर्वसन विभागाच्या सूत्रांनी दिली.

 Fodder camps to be built in drought-prone areas | दुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या

दुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या

Next

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पूनर्वसन विभागाच्या सूत्रांनी दिली. मात्र, त्यासाठी काही अटी असतील. ‘चारा छावणीला द्यायचा की दावणीला याचा निर्णय होत नसल्याने त्या बाबतचा प्रस्ताव अडला असल्याचे वृत्त लोकमतने बुधवारच्या अंकात दिले होते.
राज्याला आतापासूनच दुष्काळाच्या झळा बसणे सुरू झाल्या असताना चारा छावण्या सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षांसह शिवसेनेनेदेखील केली होती. त्यामुळे आता चारा छावण्यांबाबतचा शासकीय आदेश लवकरच काढण्यात येणार आहे. गरज असेल त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू केल्या जातील.
एका चारा छावणीमध्ये किमान ३०० ते ३५० जनावरे असतील, प्रत्येक शेतकऱ्याची चार ते पाच जनावरे छावणीमध्ये पाठविता येतील, या छावण्यांमध्ये जनावरांची संख्या वाढवायची असेल तर त्यासाठी जिल्हाधिकाºयांची लेखी परवानगी अनिवार्य असेल, अशा अटी टाकल्या जाण्याची शक्यता आहे.
मराठवाडा होतोय ‘टँकरवाडा’
जानेवारीतच मराठवाड्यात १ हजाराहून अधिक टँकर्स सुरु झाले आहेत. १७ लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर तहान भागवीत असून, सर्वाधिक टँकर्स औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. २०११ ते २०१९ या ९ वर्षांमध्ये सर्वाधिक जास्त टँकर यावर्षी लागण्याची शक्यता आहे. परभणी आणि लातूरमध्ये सध्या परिस्थिती बरी आहे. या दोन्ही जिल्ह्यात सध्या टँकरचा आकडा नगण्य आहे.
>चारा छावण्यांअभावी मराठवाड्यात जनावरांचे हाल होत असल्याचे लोकमतने प्रसिद्ध केलेले बुधवारच्या अंकातील हे वृत्त.

Web Title:  Fodder camps to be built in drought-prone areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.