औषध गुणवत्ता तपासण्यास नवीन वर्षात फ्लायिंग स्कॉड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 10:39 IST2025-10-02T10:36:16+5:302025-10-02T10:39:39+5:30
शासकीय रुग्णालयांना पुरविलेली औषधे बोगस निघाल्याच्या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. आता सरकारी रुग्णालयांतील औषधाची तपासणी करण्याचा निर्णय झाला आहे.

औषध गुणवत्ता तपासण्यास नवीन वर्षात फ्लायिंग स्कॉड
मुंबई : शासकीय रुग्णालयांना पुरविलेली औषधे बोगस निघाल्याच्या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. आता सरकारी रुग्णालयांतील औषधाची तपासणी करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करून नवीन वर्षात ‘फ्लायिंग स्कॉड’द्वारे औषधाची गुणवत्ता तपासण्यात येईल, तसेच रक्त तपासणाऱ्या प्रयोगशाळांवर अंकुश ठेवण्यासाठी अधिवेशनात नवीन कायदा आणणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी दिली.
बनावट औषधे शोधण्यासाठी विभागाने अत्याधुनिक मोबाइल मशीन खरेदी केले आहेत. आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या अखत्यारितील रुग्णालयात फ्लायिंग स्कॉड भेट देऊन औषधांची तपासणी करणार आहेत. त्यानंतर संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.
आरोग्य योजनेंतर्गत आता तात्काळ बिले अदा करणार
वर्षभरात १ कोटी महिलांची कर्करोग तपासणी करण्यात आली. १३ हजार महिलांना कर्करोगाची लक्षणे दिसून आली. त्यांना तात्काळ उपचार सुरू झाले. आता अडीच कोटी महिलांची तपासणी करण्याचे लक्ष्य आहे.
महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेंतर्गत रुग्णालयांनी उपचार केल्यानंतर तात्काळ महिनाभरात बिले देण्याचे नियोजन जानेवारीपासून करण्यात येणार आहे. १४२ कोटी रुपयांची बिले सध्या थकीत आहेत.