‘जय श्रीकृष्ण’ म्हणत न्यायाधीशांवर भिरकावली बासरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 04:45 AM2020-01-03T04:45:15+5:302020-01-03T04:45:31+5:30

दिंडोशी कोर्टातील प्रकार; सुरक्षारक्षकाला अटक

A flute was thrown at the judges saying 'Jai Sri Krishna' | ‘जय श्रीकृष्ण’ म्हणत न्यायाधीशांवर भिरकावली बासरी

‘जय श्रीकृष्ण’ म्हणत न्यायाधीशांवर भिरकावली बासरी

googlenewsNext

मुंबई : खुनाच्या खटल्याची सुनावणी सुरू असताना ‘जय श्रीकृष्ण’ म्हणत न्यायाधीशांच्या दिशेने धातूची बासरी भिरकावण्याचा प्रकार दिंडोशी कोर्टात गुरुवारी घडला. या प्रकरणी वकिलाच्या गणवेशातील ओंकारनाथ पांडे (६०) या सुरक्षारक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

साकीनाका येथे २०१७ साली घडलेल्या पांडेच्या भावाच्या हत्येचा खटला दिंडोशी कोर्टाच्या खोली क्रमांक १० मध्ये सुरू होता. सुनावणी काही वेळानंतर करण्यात येणार होती. पांडे हा साक्षीदार आहे. पांडे हा वकिलाच्या वेशात कोर्टरूममध्ये आला. ‘आज कृष्ण जन्माष्टमी आहे’, असे म्हणत तो जोरात ‘जय श्रीकृष्ण’ म्हणाला व सोबत आणलेली बासरी त्याने न्यायाधीशांकडे भिरकावली. ती कोर्टाच्या स्टेनोग्राफरला लागली. पोलिसांनी पांडेला तत्काळ अटक केली. सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिसांनी सांगितले.

Web Title: A flute was thrown at the judges saying 'Jai Sri Krishna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.