Join us

फरशी डोक्यात पडून मृत्यू, कळंबोलीतील मार्बल मार्केटमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 07:26 IST

परशुराम पासवान असे कामगाराचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पनवेल : काम करत असताना डोक्यात फरशी पडून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कळंबोली येथील मार्बल मार्केटमध्ये घडली आहे. परशुराम पासवान असे कामगाराचे नाव आहे.

परशुराम याच्या डोक्यावर फरशी पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता.  उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे काम करताना कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ही घटना कळताच कळंबोली मार्बल मार्केटमधील कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आणि सुरक्षा साधने आणि सोयी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली.

टॅग्स :मुंबईपोलिस