Join us

जून, जुलै, ऑगस्टमध्ये समुद्राला उधाण; मुंबईत पुन्हा पाणी तुंबण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 03:03 IST

समुद्राला जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात साडेचार मीटरपेक्षा जास्त भरती येणार असलेले दिवस, वेळ  व समुद्राच्या पाण्याची उंची  पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली आहे.

मुंबई : मान्सून एक महिन्यावर असला तरी मुंबई पालिकेने मान्सूनपूर्व कामे हाती घेतली आहेत. मान्सूनदरम्यान मुंबईत पाणी साचणार नाही याची काळजी घेतली जात आहे. हे सर्व सुरू असतानाच खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी मान्सूनदरम्यानच्या भरती-ओहोटीसह भरतीच्या पाण्याची उंची नोंद दिली असून, यंदा साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीची भरती येईल, असे म्हटले आहे.सध्या सर्व स्तरांवर कोरोनाशी युद्ध सुरू आहे. मे महिना उजाडला की पावसाचे वेध सुरू होतात. समुद्राच्या उधान भरतीवेळी जोराचा पाऊस झाला तर मुंबईसारख्या शहरात पाणी तुंबण्याची जास्त शक्यता असते.

समुद्राला जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात साडेचार मीटरपेक्षा जास्त भरती येणार असलेले दिवस, वेळ  व समुद्राच्या पाण्याची उंची  पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली आहे. देण्यात आलेली उंची ही लाटेची  नसून भरतीच्या पाण्याची आहे याची नोंद घ्यावी, असेही सोमण यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :पाऊस