Five killed in explosion at fireworks factory in Punjab | पंजाबमध्ये फटाके कारखान्यात स्फोट, २३ ठार
पंजाबमध्ये फटाके कारखान्यात स्फोट, २३ ठार

बाटला (पंजाब) : फटाक्यांच्या कारखान्यात बुधवारी झालेल्या स्फोटात २३ जण ठार, तर २७ जण गंभीर जखमी झाले. कारखान्याच्या मलब्याखाली किती तरी जण अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. बाटला (जिल्हा गुरदासपूर) येथे दुपारी चारच्या सुमारास हा स्फोट झाल्याचे व बचावकार्य सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. हा कारखाना नागरी वसाहतीत असल्याचे पोलीस महानिरीक्षक (सीमा भाग) एसपीएस परमार यांनी सांगितले.

स्फोटात २३ जण ठार झाले तर २७ जण गंभीर जखमी झाले असून, त्यातील चार जणांना अमृतसरच्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अत्यंत शक्तिशाली अशा या स्फोटाने जवळपासच्या इमारतींचीही हानी झाली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. भाजपचे खासदार सनी देओल यांनी या घटनेबद्दल टिष्ट्वटरवर तीव्र दु:ख व्यक्त केले.


Web Title: Five killed in explosion at fireworks factory in Punjab
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.