Join us

मुंबईतील वांद्रे परिसरात इमारत कोसळून पाच जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 23:12 IST

वांद्रे परिसरामध्ये एक रिकामी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत किमान पाच जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

मुंबई - वांद्रे परिसरामध्ये एक रिकामी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत किमान पाच जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.  वांद्रे आर्किटेक्चर कॉलेज, शेअरली राजन रोड, बांद्रा पश्चिम येथे ही दुर्घटना घडली. दरम्यान, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.  दरम्यान, ढिगाऱ्याखालून आतापर्यंत सात लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत रिकामी होती. मात्र ही इमारत बाजूच्या दुकानांवर कोसळल्याने त्याखाली काही लोक अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. 

टॅग्स :मुंबईअपघात