- मनोहर कुंभेजकरमुंबई - मढ कोळीवाड्यात हरबादेवी स्पोटर्स क्लबचे मच्छिमार आज सायंकाळी बंदरावर फुटबॉल खेळत असताना चंद्रकांत कोळी यांना टाकाऊ जाळ्यात दोन कासव अडकलेली दिसली. त्यांनी भर समुद्रात जाऊन आेढत कासवाना जाळ्यासह किना-यावर सुखरूप आणले. किना-यावर विजय कोळी,अक्षर भोईर, रोशन भगत अन्य मच्छिमारांच्या सहकार्याने दोन कासवांची सुटका करून त्यांना सुखरूप समुद्रात सोडले अशी माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचें सरचिटणीस किरण कोळी यांनी लोकमतला दिली.
जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ कासवांची मढ येथील मच्छिमारांनी दिले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 22:21 IST