साहित्याच्या दुरूस्तीमध्ये मच्छीमार गुंग

By Admin | Updated: June 30, 2014 23:16 IST2014-06-30T23:16:01+5:302014-06-30T23:16:01+5:30

सध्या मासेमारी बंदीचा कालावधी सुरू असल्यामुळे मच्छीमार निरनिराळ्या कामात मगA आहेत तर खलाशी मात्र आपल्या मूळ गावी परतले आहेत.

Fisherman Gung in the repair of the material | साहित्याच्या दुरूस्तीमध्ये मच्छीमार गुंग

साहित्याच्या दुरूस्तीमध्ये मच्छीमार गुंग

>वसई : सध्या मासेमारी बंदीचा कालावधी सुरू असल्यामुळे मच्छीमार निरनिराळ्या कामात मगA आहेत तर खलाशी मात्र आपल्या मूळ गावी परतले आहेत. 15 ऑगस्टर्पयत मासेमारी बंद असल्यामुळे मच्छीमार मासेमारी साहित्यांची दुरूस्ती करीत आहेत. गेल्या हंगामात मासेमारी करताना तुटलेल्या जाळ्या दुरूस्त करण्याच्या कामाला सध्या वेग आला आहे. पुढील महिन्यात सुरू होणा:या मासेमारीसाठी आवश्यक त्या बाबी पूर्ण करण्याकडे मच्छीमार समाजाचा कल आहे.
पावसाळ्यादरम्यान राज्य शासन खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी टाकते. त्यामुळे मच्छीमार समाज या काळात विविध कामात मगA असतो. मच्छीमारांची अनेक कुटुंबे या काळात देवदर्शनासाठी बाहेर पडतात तर अनेक मच्छीमार आपल्या बोटीची डागडुजी व साहित्याची दुरूस्ती यावर भर देत असतात. बोटीवर काम करणारे खलाशी मात्र आपल्या मुळगावी परततात व शेतीच्या कामाला लागतात. हंगाम सुरू झाला की हे खलाशी पुन्हा मच्छीमार गावांमध्ये परततात. पावसाळ्यातील मासेमारी ही मत्स्य उत्पादनावर विपरीत परिणाम करणारी ठरते म्हणून राज्यशासनाने पावसाळ्यात खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी आणली आहे. या बंदीचे सर्वच समुद्रकिनारी असलेल्या मच्छीमार गावातील मच्छीमार काटेकोरपणो पालन करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ वाढवून पुन्हा मासेमारीचा हंगाम सुरू होतो. (प्रतिनिधी) 
 
पावसाळ्यातील मासेमारी ही मत्स्य उत्पादनावर विपरीत परिणाम करणारी ठरते म्हणून राज्यशासनाने पावसाळ्यात खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी आणली आहे. त्यामुळे या काळात मच्छिमारांकडून मासेमारी जाळय़ांची दुरुस्ती, बोटीची रंगरंगोटी करण्यात येते. 

Web Title: Fisherman Gung in the repair of the material