Join us

आगामी काळात मच्छिमारांच्या सर्व प्रश्नांना न्याय देणार, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 15:10 IST

Aslam Sheikh News : राज्याच्या एकूण मत्स्योत्पादनात वाढ करणं हे राज्य शासनाचं उद्दीष्ट असून सागरी मासेमारी बरोबरच भूजल मासेमारीवर भर देण्याचे व आधुनिक तंत्रज्ञान व योग्य ते प्रशिक्षण घेऊन कमीत-कमी जागेत जास्तीत-जास्त मत्स्योत्पादन करणार

मुंबई : आगामी काळात मच्छिमार बांधवांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून मच्छिमार समाजातील तरूण या व्यवसायात टिकून राहण्यासाठी शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

राज्याच्या एकूण मत्स्योत्पादनात वाढ करणं हे राज्य शासनाचं उद्दीष्ट असून सागरी मासेमारी बरोबरच भूजल मासेमारीवर भर देण्याचे व आधुनिक तंत्रज्ञान व योग्य ते प्रशिक्षण घेऊन कमीत-कमी जागेत जास्तीत-जास्त मत्स्योत्पादन करण्याचे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी  दिली. 

मालाड पश्चिम भाटी गावातील भाटी मच्छिमार सर्वोदय सोसायटीच्या सभागृहात मच्छिमार बांधवांसाठी काल रात्री आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, मढ, वेसावा व मुंबई शहर येथील ३० पेक्षा जास्त मच्छिमार संस्थांचे ८०० प्रतिनिधी या चर्चासत्राला उपस्थित होते. 

उपस्थित मच्छिमार संस्थांच्या प्रतिनिधींना क्रमाक्रमाने भेटून  अस्लम शेख यांनी त्यांच्या समस्या समजून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना समस्या सोडविण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी मच्छीमार नेते धनाजी कोळी, डाॅ.नेक्सन नाटके, लिओ कोलासो, संतोष कोळी,डॉ.गजेंद्र भानजी, जोजफ कोलासो, रॉनी किणी आणि इतर मच्छिमार संस्थांचे प्रतिनिधी व प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :मच्छीमारमहाराष्ट्र सरकार