शिक्षक दिन : धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या पहिल्या शिक्षिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 03:31 IST2019-09-05T03:31:17+5:302019-09-05T03:31:23+5:30

विद्यार्थ्यांची बाजू समर्थपणे मांडणे शक्य ; शिक्षकाला सरकारी कामकाजात स्थान मिळाल्याने शिक्षण क्षेत्राला नवी दिशा

The first teacher to make strategic decisions | शिक्षक दिन : धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या पहिल्या शिक्षिका

शिक्षक दिन : धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या पहिल्या शिक्षिका

मुंबई : स्वत: शिक्षिका असताना हे क्षेत्र सोडून मंत्रालयात शिक्षण विभागाशी निगडित धोरणात्मक निर्णय घेण्याची जबाबदारी म्हणजे सुरुवातीला अग्निदिव्य वाटले; मात्र हा माझ्या शिक्षकी पेशाचा सन्मान असल्याचीही जाणीव झाली. आज कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना शिक्षक आणि विद्यार्थ्यांची बाजू समर्थपणे मांडता येते. पाठ्यपुस्तकातील बदल असो किंवा शिक्षक पुरस्कारामध्ये कोणत्या प्रकारची पारदर्शकता हवी यापर्यंतच्या निर्णयांमध्ये प्रत्येक बाजूची चौकस मांडणी करता येणे जमले. यामुळे शिक्षकाला शासकीय कामकाजात स्थान दिल्यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षणाला नवी दिशा मिळाली आहे; आणि हा पायंडा असाच चालू राहावा अशी अपेक्षा आहे.

शाळेतील दुसरा दिवस तसा थोडा नकारात्मकच वाटला कारण नियम माहीत नसल्याने चित्रकलेच्या तासाला रंग नेले नाहीत आणि परिणामी शाळेत जमिनीवर बसावे लागले. हा प्रसंग मनात घर करून गेला आणि पुढे स्वत: शिक्षिका म्हणून वावरताना आणि विद्यार्थ्यांसोबत वागताना शक्यतो आपल्याकडून असे काही घडणार नाही; किंबहुना घडू दिले नाही याची काळजी घेतली. प्रसंग नकारात्मक असला तरी तो सकारात्मक परिणाम आयुष्यावर करून गेला. वडिलांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि शिकवणीमुळे हे धडे मिळाले आहेत.

बदलत्या काळानुसार शिक्षक विद्यार्थ्यांशी कनेक्ट़़़
प्रत्येकाच्या मनात आपल्या शिक्षकाप्रति अत्यंत आदराची भावना असते. पण, शिक्षक आता केवळ मार्गदर्शक राहिलेला नाही. काळानुसार हे नातं खूप बदललं आहे आणि बदलायलाही हवं. बरेचसे शिक्षक अभ्यासाव्यतिरिक्त अनेक गोष्टींत मुलांच्या सोबत असतात. त्यांच्यासोबत ते व्हॉटसअ‍ॅपवर कनेक्ट असतात, फेस्टिव्हलच्या तयारीत उतरतात. हे असं मित्रत्वाचं नातंच आजच्या विद्यार्थ्यांना हवं आहे.

शाळेतल्या आणि महाविद्यालयातल्या २ आठवणीतल्या शिक्षिकांनी माझ्यावर विशेष प्रभाव टाकला. माझी शाळा म्हणजे ग्रॅण्ट रोड येथील सेंट कोलंबा मराठी माध्यम. तिथल्या मराठी विषय शिकविणाºया गोडबोले बाईंमुळे खरेतर मराठी विषयाची गोडी लागली. त्यांनी शाळेच्या आवारात बसवून शिकविलेली ‘ती फुलराणी’ कविता विशेष लक्षात राहणारी होती. भाषा म्हणजे काय? हे त्यांच्यामुळे कळले असे म्हणायला हरकत नाही. त्यांचे ‘स्वत: स्वत:चा उत्कर्ष कर’ हे वाक्य माझ्यासाठी जादूची छडी ठरले. माझ्यातील आत्मविश्वास म्हणजे त्यांचे हे वाक्य होते.

भाषेची गोडी आणि त्याचे महत्त्व़़़
दुसºया आठवणीतील शिक्षिका म्हणजे रूपारेल महाविद्यालयातील माधुरी पणशीकर. मराठी विषय आणि त्याचा एकूण आयाम काय असतो हे यांच्यामुळे शिकायला मिळाले. शाळेत रुजलेल्या मराठी विषयाच्या बीजाचा वटवृक्ष होण्यास त्यांच्यामुळे मदत झाली आणि आणि पुढे मी बीए करताना साहित्य विषय म्हणून मराठी निवडण्यात या बाईंचा मोठा हातभार लागला. भाषाविषयक गोडी आणि त्याचे एकूण महत्त्व यांच्यामुळेच लक्षात आले.

शिक्षकाविना अधिकारी झाले नसते...

Web Title: The first teacher to make strategic decisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.