राणीबागेत देशातील पहिले मुक्त पक्षी विहार दालन, २६ जानेवारीपासून खुल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 06:51 AM2020-01-25T06:51:34+5:302020-01-25T06:52:12+5:30

भायखळ्यातील राणीच्या बागेत मुक्कामाला आलेल्या नवीन पाहुण्यांचे २६ जानेवारीपासून मुंबईकरांना दर्शन होईल. यामध्ये अस्वल, तरस, कोल्हा आणि बिबट्या यांचा समावेश आहे.

The first open bird monastery in the country will open in Ranibagh from January 26 | राणीबागेत देशातील पहिले मुक्त पक्षी विहार दालन, २६ जानेवारीपासून खुल

राणीबागेत देशातील पहिले मुक्त पक्षी विहार दालन, २६ जानेवारीपासून खुल

Next

मुंबई : भायखळ्यातील राणीच्या बागेत मुक्कामाला आलेल्या नवीन पाहुण्यांचे २६ जानेवारीपासून मुंबईकरांना दर्शन होईल. यामध्ये अस्वल, तरस, कोल्हा आणि बिबट्या यांचा समावेश आहे. शिवास विविध प्रजातींच्या सुमारे शंभर पक्षी असलेले मुक्त पक्षी विहार दालन हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. अशा प्रकारचे भारतातील हे पहिलेच दालन आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर येत्या रविवारी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे प्राणी व पक्ष्यांच्या सहा दालनांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येईल. देश विदेशातील शंभर पक्षी येथे जवळून न्याहाळता येतील. तसेच बिबट्या, अस्वल, कोल्हा, तरस, कासव यांच्यासाठीही उच्च दर्जाची पारदर्शकता असणाऱ्या काचेच्या भिंती असणारी अत्याधुनिक दालने खुले करण्यात येतील.

असे आहे मुक्त पक्षी विहार दालन
भारतात पहिल्यांदाचा उभारण्यात आलेले मुक्त पक्षी विहार दालन हे ४४ फूट उंचीचे म्हणजे पाच मजली इमारती एवढे आहे. तब्बल १८ हजार २३४ चौरस फुट क्षेत्रफळ असणाºया या दालनात देश- विदेशातील वेगवेगळ्या प्रजातींचे व प्रामुख्याने पाणथळ जागांच्या जवळ राहणारे सुमारे १०० छोटे -मोठे पक्षी आहेत.
याच विहारामध्ये १६ फुट उंचीवरुन वाहणारा नयनरम्य धबधबा आणि मनोहारी ओहोळदेखील आहे. या दालनाचे वैशिष्ट्य म्हणजे यात असणारा ९६ मीटर लांबीचा पादचारी पूल. वैशिष्ट्यपूर्ण प्रवेशद्वारे असणाºया या पुलावरुन मुक्त पक्षी विहारात नागरिक प्रवेश करू शकतील. यामुळे पक्ष्यांना अधिक जवळून पाहणे व त्यांचे छायाचित्रण करण्याची संधी त्यांना मिळेल.

कासवांसाठी स्वतंत्र दालन
दोन उपविभाग असणाºया या दालनात पाण्यातील कासव अर्थात टर्टल व जमिनीवरील कासव अर्थात टॉरटॉईज हे एकाच ठिकाणी बघता येणार आहेत. सुमारे एक हजार २३४ चौरस फूट एवढे क्षेत्रफळ असणाºया या दालनात पाण्यातील कासवांसाठी एक छोटे तळे विकसित करण्यात आले आहे. तर जमिनीवरील कासवांसाठी छोटी घरटीही या ठिकाणी आहेत. या दालनाच्या दर्शनी भागाच्या भिंतीदेखील वैशिष्ट्यपूर्ण काचेच्या आहेत. ज्यामुळे बच्चे कंपनीला अधिक जवळून चालणाºया व पोहणाºया कासवांना बघता येणार आहे.
कर्नाटकातील मंगळुरू येथील प्राणिसंग्रहालयातून आणलेला बिबट्या व कोल्हा, म्हैसूर प्राणिसंग्रहालायातून आणलेला तरस, गुजरातमधील सुरत येथील प्राणिसंग्रहालयातून आणलेले अस्वल या प्राण्यांसाठी दालने उभारण्यात आली आहेत. दालनामध्ये असणाºया प्राण्यांची ठळक वैशिष्ट्ये सांगणारे सचित्र माहितीफलक दालनाजवळ बसविण्यात आले आहेत. बिबट्यासाठी उभारण्यात आलेल्या दालनाचे क्षेत्रफळ २८ हजार ८७९ चौरस फूट एवढे आहे. अस्वलासाठी २२ हजार ६२५ चौरस फूट, तरसासाठी नऊ हजार ४७२ चौरस फूट आणि कोल्ह्यासाठी सात हजार २६५ चौरस फूट आकाराचे दालन उभारण्यात आले आहे.

Web Title: The first open bird monastery in the country will open in Ranibagh from January 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई