आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:59 IST2025-08-07T14:58:17+5:302025-08-07T14:59:08+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी रॅपिडो कंपनीवर काही दिवसापूर्वी कारवाई केली होती.

आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
पावसाळी अधिवेशनावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रॅपिडो विरोधात फिल्मीस्टाईल कारवाई केली होती. ॲपद्वारे प्रवाशाची बुकिंग घेणाऱ्या रॅपिडो बाइकला परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनीच रंगेहात पकडले होते. त्यावेळी त्यांनी कंपनीविरोधात कारवाई करणार असल्याची माहिती दिली होती. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. आधी ज्या कंपनीविरोधात सरनाईक कारवाई करणार होते. आता त्याच कंपनीने सरनाईक यांच्या मुलाने आयोजित केलेल्या प्रो. गोविंदा स्पर्धेला स्पॉन्सर केले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
या लिगच्या उद्घाटना मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. यावरुन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरुन आरोप केले आहेत.
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
"परिवहन मंत्र्यांचा डबल धमाका, रॅपिडो बाईक आली. त्याला खुद्द मंत्र्यांनी अडवून कारवाई केली. बातम्या झाल्या, प्रसिद्धी मिळाली. मंत्र्यांनी ’रॅपिड’ भूमिका बदलली आणि शेवटी मांडवली होऊन स्पॉन्सरशीप मिळाली. यावरून हे सरकार जनतेसाठी नाही तर स्वतःसाठीच काम करतंय, हे स्पष्ट होतं! पण मला सरकारला विचारायचंय की हा मंत्रीपदाचा गैरवापर तर नाही ना?, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केला.
परिवहन मंत्र्यांचा #डबल_धमाका
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 7, 2025
रॅपिडो बाईक आली..
त्याला खुद्द मंत्र्यांनी अडवून कारवाई केली...
बातम्या झाल्या, प्रसिद्धी मिळाली...
मंत्र्यांनी ’रॅपिड’ भूमिका बदलली आणि
शेवटी मांडवली होऊन स्पॉन्सरशीप
मिळाली...
यावरून हे सरकार जनतेसाठी नाही तर स्वतःसाठीच काम करतंय, हे स्पष्ट… pic.twitter.com/617RzS6OWE
नेमकं प्रकरण काय?
पावसाळी अधिवेशन काळात मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः नाव बदलून त्यांनी 'रॅपिडो अॅप'च्या माध्यमातून रॅपिडो बाईक बुक केली. मंत्रालयाबाहेर प्रताप सरनाईक यांनी त्यांचे सहकारी गाडीची वाट बघत होती. गाडी आल्यानंतर ज्या कंपनीच्या ॲपच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जाते यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
मात्र यावेळी प्रताप सरनाईक यांनी संबंधित दुचाकी चालकावर कारवाई करणे टाळले. या ऐवजी सरनाईक यांनी त्या बाईकच्या चालकाला यांनी भाडे म्हणून 500 रुपये देऊ केले होते. त्यांनी या रॅपिडो कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, आता याच कंपनीकडून कार्यक्रमाला स्पॉन्सशीप घेतल्याचे समोर आले आहे.