अंतिम वर्ष परीक्षांचा पहिला दिवस सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 02:16 AM2020-10-02T02:16:01+5:302020-10-02T02:16:26+5:30

बॅकलॉग परीक्षांसाठी महाविद्यालयांचे ९४ समूह; परीक्षांच्या यशस्वी आयोजनासाठी तज्ज्ञांची समिती 

The first day of the final year exams was smooth | अंतिम वर्ष परीक्षांचा पहिला दिवस सुरळीत

अंतिम वर्ष परीक्षांचा पहिला दिवस सुरळीत

googlenewsNext

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या २०१९-२०च्या अंतिम वर्ष सत्राच्या परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात झाली असून, मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, विद्यापीठ शैक्षणिक विभाग आणि दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील विद्यार्थी या परीक्षांना बसले होते. चारही विद्याशाखेअंतर्गत विविध अभ्यासक्रम आणि विषयांच्या परीक्षा आज सुरळीत पार पडल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. 

अत्यंत सुलभ अशा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून  विद्यापीठाने आणि महाविद्यालयांनी आॅनलाइन बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपात परीक्षा घेतल्या. परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना नमुना प्रश्नपत्र व त्यांच्या सराव परीक्षाही घेण्यात आल्या होत्या. कतांत्रिक कारणाने एखादा विद्यार्थी परीक्षेला बसू शकला नसेल अशा विद्यार्थ्याला परीक्षेसाठी पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. बॅकलॉग आणि नियमित परीक्षांच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाने विद्याशाखानिहाय महाविद्यालयांचे ९४ समूह तयार केले आहेत. दरदिवशीच्या परीक्षांविषयक घडामोडी आणि अनुषंगिक बाबींसाठी विद्यापीठाने कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली निरीक्षण समिती तयार केली असून, या समितीमध्ये प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र्र कुलकर्णी यांच्यासह  सर्व अधिष्ठाता, सहायक अधिष्ठाता, जिल्हानिहाय समन्वयक, प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ यांचा समावेश आहे.

कुलगुरू प्रा. पेडणेकर यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
अंतिम वर्ष / सत्राच्या परीक्षांना प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांना प्रथमच आॅनलाइन माध्यमातून परीक्षा द्याव्या लागत असल्याने अशा विद्यार्थ्यांच्या असलेल्या काही समस्या, अडचणी आणि शंकांचे निरसन व्हावे यासाठी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील महाविद्यालयातील सुमारे ५ हजारांहून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले होते.

Web Title: The first day of the final year exams was smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.