सलमानच्या निवासस्थानाबाहेरील गोळीबार; विशेष न्यायालयात नऊ आरोपींविरोधात आरोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 10:20 IST2024-07-09T10:19:57+5:302024-07-09T10:20:06+5:30

मोक्का कायद्यांतर्गत आरोपींचा कबुली जबाब, २२ पंचनामेही व अन्य कागदपत्रे आरोपपत्राला जोडण्यात आली आहेत.

Firing outside Salman Khan residence Charge sheet against nine accused in special court | सलमानच्या निवासस्थानाबाहेरील गोळीबार; विशेष न्यायालयात नऊ आरोपींविरोधात आरोपपत्र

सलमानच्या निवासस्थानाबाहेरील गोळीबार; विशेष न्यायालयात नऊ आरोपींविरोधात आरोपपत्र

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान लोकमत न्यूज नेटवर्क खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा अटकेत असलेल्या व तीन फरार आरोपींमध्ये तुरुंगातील लॉरेन्स बिश्नोईवरही विशेष मोक्का न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

मुंबईच्या क्राईम ब्रँचने दाखल केलेल्या १,७३५ पानांच्या आरोपपत्रांत अनेक कागदपत्रांसह ४६ साक्षीदारांची साक्ष आणि सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत दंडाधिकाऱ्यांनी आरोपींचे नोंदविलेल्या जबाबांचाही समावेश आहे. मोक्का कायद्यांतर्गत आरोपींचा कबुली जबाब, २२ पंचनामेही व अन्य कागदपत्रे आरोपपत्राला जोडण्यात आली आहेत. १४ एप्रिल रोजी सकाळी दोन बाईकस्वारांनी सलमान खानच्या वांद्रे येथील राहत्या ठिकाणी बंदुकीच्या गोळ्या झाडल्या होत्या. पोलिसांनी त्यांच्यासह इतरांना अटक केलेली आहे.

Web Title: Firing outside Salman Khan residence Charge sheet against nine accused in special court