Join us
Daily Top 2Weekly Top 5

 वांद्रे येथील शास्त्रीनगर परिसरात झोपडपट्टीला आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 03:40 IST

वांद्रे येथील झोपडपट्टयांना आग लागण्याचे सत्र कायम आहे

मुंबई -  वांद्रे येथील झोपडपट्टयांना आग लागण्याचे सत्र कायम असून, गुरुवारी रात्री येथील शास्त्रीनगर परिसरात असलेल्या झोपडपट्टीला मोठी आग लागली. दरम्यान, ही आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाचे 15 बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने ही आग काही वेळात नियंत्रणात आली. दरम्यान, या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. 

काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीत भीषण आग लागली होती. या आगीचे कारण स्पष्ट झाले नव्हते. वांद्रे पश्चिमेकडील लालमाती परिसरात ही आग लागली होती. 

 

टॅग्स :आगमुंबई