Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत ड्रीमलँड सिनेमाजवळील रहिवासी इमारतीला आग, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 13:21 IST

ग्रँटरोडमधील ड्रीमलँड सिनेमाजवळ असलेल्या शंतिनिकेतन या रहिवासी इमारतीला आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आग लागली.

मुंबई - ग्रँटरोडमधील ड्रीमलँड सिनेमाजवळ असलेल्या शंतिनिकेतन या रहिवासी इमारतीला आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आग लागली. दरम्यान, आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवानआठ गाड्या आणि पाण्याचे सहा बंबासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर अग्निशमन दलाच्या एका जवानासह दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ड्रीमलँड सिनेमाजवळ असलेल्या शांतिनिकेतन या इमारतील सकाळी सहाच्या सुमारास आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाने आठ गाड्या, आणि पाण्याच्या सहा गाड्यांसह आग शमवण्याचे कार्य सुरू केले. दरम्यान, इमारतीतून येत असलेल्या धुरामुळे आग विझवण्याच्या कामात अडथळे येत होते.  

टॅग्स :मुंबईआग