मलबार हिल येथील रहिवासी इमारतीला आग; आठ जणांची सुखरुप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 21:19 IST2020-02-05T21:15:58+5:302020-02-05T21:19:31+5:30
लिटील गिब्स रोडवरील तळमजला अधिक १४ माळ्याच्या लास्ट प्लाम या रहिवासी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर बुधवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.

मलबार हिल येथील रहिवासी इमारतीला आग; आठ जणांची सुखरुप सुटका
मुंबई : मलबार हिल येथील लिटील गिब्स रोडवरील तळमजला अधिक १४ माळ्याच्या लास्ट प्लाम या रहिवासी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर बुधवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या वतीने घटनास्थळी आठ फायर इंजिन, सात जम्बो टँकर्ससह चार रुग्णवाहिका तातडीने धाडण्यात आल्या. आग शमविण्याचे काम सुरू असतानाच विशेष उपकरणांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त इमारतीमधून आठ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. या आठ जणांमध्ये तीन महिला, पाच पुरुषांचा समावेश आहे.
#UPDATE: Chief Fire Officer, Mumbai Fire Brigade: Three persons have been rescued till now. Rescue operation underway. https://t.co/ztAQqdnz6m
— ANI (@ANI) February 5, 2020