Fire In Mumbai: आगीपासून वाचण्यासाठी खिडकीबाहेर आला, १९व्या मजल्यावरून पडून जीव गमावला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 13:29 IST2021-10-22T13:24:18+5:302021-10-22T13:29:33+5:30
Fire In Mumbai: मुंबईतील करीरोड परिसरात असलेल्या अविघ्न वन पार्क इमारतीमध्ये भीषण आग

Fire In Mumbai: आगीपासून वाचण्यासाठी खिडकीबाहेर आला, १९व्या मजल्यावरून पडून जीव गमावला!
मुंबई: मुंबईतील करी रोड येथे असलेल्या वन अविघ्न पार्क या ६० मजली इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ही आग लागली असून ती हळूहळू वाढताना दिसत आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. या दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी झाली होती, तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.
अविघ्न वन पार्कमधील १९ व्या मजल्यावर भीषण आग लागली. ही आग हळूहळू वाढत गेली. तिनं आणखी काही मजले कवेत घेतले. १९ व्या मजल्यावर एक व्यक्ती जीव वाचवण्यासाठी बाल्कनीमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केली. या प्रयत्नात ती व्यक्ती खाली कोसळली. अरुण तिवारी असं त्यांचं नाव आहे. त्यांचं वय ३० वर्षे होतं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांनी डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
मुंबई- करीरोड परिसरातील वन अविघ्न पार्क इमारतीत भीषण आग;
— Lokmat (@MiLOKMAT) October 22, 2021
जीव वाचवताना १९ व्या मजल्यावरून पडल्यानं एकाचा मृत्यू https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/XiIvhFNcgY
करी रोड येथील माधव पालव मार्गावर वन अविघ्न पार्क ही ६० मजली इमारत आहे. या इमारतीमधील १९ व्या मजल्याला ही आग लागली आहे. सकाळी ११.५१ च्या सुमारास ही आग लागली आहे. आगीची भीषणता पाहून लेव्हल ३ ची आग असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र आगीचे गांभीर्य वाढल्याने ही आग लेव्हल ४ ची असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत. तसेच उंचावर वाहत असलेल्या वाऱ्यामुळे आग भडकत असून, जीव वाचवण्यासाठी इमारतीलमधील रहिवासी आटापिटा करत आहेत.