Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंधेरी येथील कामगार रुग्णालयात पुन्हा आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 20:29 IST

दोन दिवसांपूर्वीच आग लागून ९ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मुंबईतील अंधेरी येथील कामगार रुग्णालयालात आज पुन्हा आग लागली.

मुंबई - दोन दिवसांपूर्वीच आग लागून ९ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मुंबईतील अंधेरी येथील कामगार रुग्णालयालात आज पुन्हा आग लागली. रुग्णालयातील मीटर बॉक्सला लागलेल्या आगीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आहे.  अंधेरी पूर्व येथील कामगार हॉस्पिटलला सोमवारी दुपारी लागलेल्या आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला होता. तर १४० हून अधिक जण जखमी झाले होते. 

टॅग्स :मुंबईआग