Join us

VIDEO : गिरगावातील कोठारी हाऊस इमारतीला आग, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 21:33 IST

गिरगावमधील कोठारी हाऊस बिल्डिंगला रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली

मुंबई -  गिरगावमधील कोठारी हाऊस बिल्डिंगला रविवारी संध्याकाळी  लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. गिरगाव परिसरात असलेल्या कोठारी हाऊस या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरू केले होते.   

या आगीची तीव्रता एवढी भीषण होती की त्यात इमारतीचे दोन मजले भक्ष्यस्थानी पडले. सुरुवातीला या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. नंतर मात्र या आगीत जखमी झालेल्या एका व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. 

 

टॅग्स :आगमुंबई