‘जॉन्सन टाइल्स’ कारखान्यात आग

By Admin | Updated: May 5, 2017 04:11 IST2017-05-05T04:11:57+5:302017-05-05T04:11:57+5:30

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गडब गावाच्या हद्दीतील जॉन्सन टाईल्स कारखान्याच्या बीएसआर विभागात गुरुवारी

Fire in 'Johnson Tiles' Factory | ‘जॉन्सन टाइल्स’ कारखान्यात आग

‘जॉन्सन टाइल्स’ कारखान्यात आग

अलिबाग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गडब गावाच्या हद्दीतील जॉन्सन टाईल्स कारखान्याच्या बीएसआर विभागात गुरुवारी सकाळी १०.३० वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यानंतर आग शेजारच्या गोडाऊनमध्ये पोहोचली. येथे मोठ्या प्रमाणात असलेल्या टाईल्स पॅकिंग मटेरियल व थर्माकोलने पेट घेतला. परिसरात धुराचे लोट पसरल्याने आजपासच्या गावांत काही काळ भीतीचे वातावरण होते. आगीत कोणताही जीवित हानी झाली नाही. आगीचे वृत्त समजताच जेएसडब्ल्यू कंपनीच्या दोन, तर पेण नगरपरिषदेची अग्निशमन गाडी घटनास्थळी पोहोचली. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Fire in 'Johnson Tiles' Factory