Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोवंडी, भांडुप, बोरीवलीत आगीच्या घटना, वखार, निवासी इमारतीत दुर्घटना; लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 14:16 IST

​​​​​​​रहिवासी इमारत असल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आग शमविली. 

मुंबई : गाेवंडी व बाेरीवली परिसरात शनिवारी वखारीला व निवासी इमारतीत आग लागली. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला. तसेच भांडुप स्टेशन रोडवरील कपड्यांच्या दुकानाला सकाळी आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. या तीनही दुर्घटनांमध्ये कुठल्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाही.

परिसरात उडाली घबराट -गोवंडीतील नव्या गौतमनगरमधील जनता मार्केट येथे सकाळी ८.४० वाजता वखारीला अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, बोरीवली (पश्चिम) येथील म्हाडा वसाहतीमधील प्रथमेश टॉवर या नऊ मजली इमारतीच्या  डक्टमध्ये सकाळी १०.४६ च्या सुमारास आग लागली.रहिवासी इमारत असल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आग शमविली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: Fires in Govandi, Bhandup, Borivali; Property Damage Reported

Web Summary : Fires erupted in Mumbai's Govandi, Bhandup, and Borivali on Saturday, damaging a warehouse, shop and residential building. Firefighters quickly controlled the blazes, preventing casualties and further destruction. Losses estimated in lakhs.
टॅग्स :आग