विलेपार्ल्यात आग, ९५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू, दिवाळीची धामधूम सुरू असताना दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 11:04 IST2023-11-11T10:21:05+5:302023-11-11T11:04:57+5:30
विलेपार्ले पूर्व येथील नरिमन रोडवरील विले ग्रँड रेसिडन्सी या १२ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक २०१ मध्ये आग लागली.

विलेपार्ल्यात आग, ९५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू, दिवाळीची धामधूम सुरू असताना दुर्घटना
मुंबई : दिवाळीची धामधूम सुरू असताना विलेपार्ले पूर्वमधील पुनम बाग भागातील १२ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर शुक्रवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास आग लागली. रात्री आठ वाजेपर्यंत अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, या दुर्घटनेत ९५ वर्षीय हर्षदा जनार्दन पाठक यांचा मृत्यू झाला. कूपर रुग्णालयात त्यांना दाखल केल्यानंतर डॉ. वाळके यांनी त्या मृत झाल्याचे घोषित केले.
विलेपार्ले पूर्व येथील नरिमन रोडवरील विले ग्रँड रेसिडन्सी या १२ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक २०१ मध्ये आग लागली. या दुर्घटनेत फर्निचर, टीव्ही, फ्रिज, लाकडाच्या वस्तू, घरातील इतर साहित्य तसेच फॉल सिलिंग व खाद्यपदार्थांनी पेट घेतला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून वीजपुरवठा बंद करून आग विझविली. आगीचे कारण समजू शकले नाही.