Join us

मुंबईमधील ताडदेव परिसरातील २० मजली इमारतीमध्ये आग; अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 09:00 IST

अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सूरु आहेत. 

मुंबई: मुंबईतील ताडदेव भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या कमला या बहुमजली आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागली असून या घटनेत २ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही इमारत २० मजली असून इमारतीच्या १८व्या मजल्यावर आग लागली आहे. ही आग लेव्हल ३ची असल्याचे अग्निशमन दलाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सूरु आहेत. आगीचे लोट इमारतीच्या बाहेर स्पष्टपणे दिसत आहेत तसेच धूर ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. इमारतीतील नागरिकांना घरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले आहे.

इमारतीमध्ये आणखी काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सुद्धा दाखल झाल्या आहेत.

टॅग्स :आगमुंबई