Join us

BREAKING: बोरीवलीत रहिवासी इमारतीला भीषण आग, दोघांचा मृत्यू, तीन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 13:19 IST

मुंबईच्या कांदिवली पश्चिम येथे रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे.

मुंबई-

मुंबईच्या बोरीवली पश्चिम येथे रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. महावीर नगरच्या पवन धाम वीणा संतूर नावाच्या ९ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिका अधिकारी, पोलीस आणि रुग्णवाहिका देखील घटनास्थळावर पोहोचली आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. तरी इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. 

आगीत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ग्लोरी वालफटी (४३), जोसू रॉबर्ट (०८) अशी मृतांची नावं आहेत. तर लक्ष्मी बुरा (४०), राजेश्वरी भरतारे (२४), रंजन शहा (७६) अशी जखमींची नावं आहेत. 

टॅग्स :आग